हिंदुत्ववादी मित्रांनी पुरोगाम्यांशी वैचारिक लढा उभारताना तर्क खुंटीवर ठेवणे आवश्यक आहे.
पुरोगामी , कम्युनिस्ट , इस्लाम , किरीस्ताव. कोंग्रेस , समाजवादी , अंधश्रद्धा निर्मूलन समिति आणि त्या सारख्या संस्था..
ये सब एक ही थाली के चट्टे बट्टे है
यांचे चेहरे म्हणजे राजकीय नेते , सोशल मीडियातील प्रसिद्ध लोक…, सेलिब्रिटी, खेळाडू , चित्रपट नाट्य कलाकार मंडळी , टेलिव्हीजन स्टार, लेखक , विचारवंत. पत्रकार …………..
यांच्यापैकी एक जण एखादा मुद्दा बोलला… की तुम्ही लगेच observation mode मध्ये जा…. त्याच पद्धतीची वक्तव्ये , त्याच पद्धतीच्या बातम्या , त्याच पद्धतीच्या घटना एकामागोमाग एक समोर येऊ लागतात.
ज्या प्रमाणे फेसबुक चा algoritham काम करतो जणू त्याच पद्धतीने या गोष्टी समोर आणल्या जाऊ लागतात.
यांचे बिंग कधी कधी फुटते..
जसे all eyes on rafah हे तर ग्लोबल लेवल ला फुटलेले बिंग होते त्यात भारतातील सेलिब्रिटी सुद्धा नागडे झाले..
त्याच प्रमाणे यावेळी दिवाळीतील फटाक्यांवर राज्य आले आहे.
फटाक्यांच्या बद्दलचे सगळे आक्षेप मला 100 % मान्य आहेत..
परंतु ध्वनि, वायु , जल प्रदूषण देशात 365 दिवस आणि 24 तास होत असताना दिवाळीतील चार दिवस , त्यात सुद्धा जास्त करून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी होणारा फटाक्यांचा धूर हा सगळ्यांच्या डोळ्यात का सलू लागतो हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
समोरच्या माणसाला तुम्हाला संभ्रमित करायचे असेल तर तो पटेल असाच मुद्दा मांडणार आहे. परंतु हा मुद्दा मांडताना त्याचे उद्दीष्ट काय आहे ?? आणि हा मुद्दा आत्ताच का मांडला जातो आहे ?? हे दोन प्रश्न तुमच्या मेंदूत आलेच पाहिजेत.
होय माझ्या हिंदू धर्मात 100 दोष आहेत.. मी तर म्हणतो 100 नाही 1000 दोष आहेत.. परंतु आमच्या धर्मातील हे दोष दूर करायला वेळोवेळी आमच्या धर्मात संत , महंत , विभूति , गुरु जन्माला आले आणि त्यांनी आईच्या मायेने समाजाचे प्रबोधन करून समाजातील हे दोष दूर केले आहेत.
हिंदू धर्म लवचिक आहे, आम्ही बदल स्वीकारतो. 26 जानेवारी 1950 साली संविधान लागू होण्यापूर्वी भारतातील हिंदू समाजात बहुपत्नीत्व प्रथा होती. परंतु संविधान लागू झाले आणि हिंदूंनी ही एकपत्नी प्रथा स्वीकारली आणि त्याचे प्रामाणिक पालन करत आहेत. आजही बहुपत्नीत्व अत्यंत मागास आणि आदिवासी समाजात आहे आणि ते सुद्धा दुर्मिळ आहे. एकंदर सर्वच हिंदूंनी संविधानाचा हा नियम आत्मसात केला. मुसलमान अजूनही एकपत्नीत्व स्वीकारण्यास तयार नाहीत आणि मुस्लिमांच्या प्रेमात पडलेले आपले राजकीय पक्ष अजूनही समान नागरी कायदा लागू करण्याचे धाडस करत नाहीत. याला भाजपा सुद्धा अपवाद नाही. अजूनही अमित शहा समान नागरी कायदा लागू करू हे तुणतुणेच वाजवत आहेत. महाराष्ट्र शासन समिति नेमून मोकळे झाले आहे.
उद्या सरकार ने फटाके बंदी घोषित केली तर सामान्य हिंदू टीका करेल परंतु अंतिमतः तो हा निर्णय सुद्धा पचवेल. नेमके हेच इतर धर्मीय करत नाहीत.. सरकारच्या लाडक्या जाती करत नाहीत परंतु त्यांच्याबद्दल बोलण्याची वेळ आली की भाजपा सह सगळे राजकीय पक्ष शहामृग होतात. समस्त उपरोनिर्दिष्ट मंडळी अंतर्धान पावतात.
त्यांचे हे ढोंग समजून घ्या..
त्यामुळे आपल्याला आता तर्क खुंटीला टांगून ठेवूनच हे मुद्दे हाताळणे आवश्यक आहे. तुम्हाला आठवत असेल 90 च्या दशकाच्या आरंभी मुस्लिम समाजाने मुबईत शुक्रवारी भर रस्त्यावर नमाज पढणे सुरू केले होते आणि कोंग्रेस सरकार चे त्यांना पाठबळ होते. यासंदर्भात वारंवार टीका करूनही परिस्थिती बदलत नाही हे पाहिल्यावर शिवसेना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर महाआरती सुरू केल्या.. पुरोगामी गॅंग ने महा आरतींवर टिकास्त्र सोडले परंतु नमाज पढण्यावर बोलण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. परंतु महाआरती प्रकरण वाढते आहे हे पाहून सरकारने रस्त्यावरील नमाज विरुद्ध पण कारवाई करण्यास सुरुवात केली आणि महाआरती बंद झाली.
फटाक्यांच्या वरील टिकास्त्र सुद्धा असेच आहे. तुम्हाला त्रास होत असेल तर आम्ही दुप्पट फटाके फोडणार ही भूमिका घेतल्याशिवाय ही मंडळी सरळ होत नसतात. त्यामुळे थोडा त्रास सहन करा आणि फटाके फोडा…
सेलिब्रिटींनी वर्षभर होणार्या जल वायु आणि ध्वनि प्रदूषणाच्या विरोधात दंड थोपटावे. सरकार ने वर्षभर होणारे प्रदूषण रोखून दाखवावे , स्वतः कार्यक्षम व्हावे सामान्य हिंदू आनंदाने फटाक्यांचे प्रमाण कमी करून हळू हळू बंद सुद्धा करतील. परंतु पहिले पाऊल आम्ही उचलणार नाही. आधी सरकार आणि या उथळ सेलिब्रिटी मंडळींनी दोन पावले उचलावी मग आम्ही पण नक्की 4 पावले पुढे येऊ.
धन्यवाद.
लेखक – सुजीत भोगले

